
विशेष बातमी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शेलापुर खुर्द येथे कार्यक्रम संपन्न.
मोताळा प्रतिनिधी : दिनांक ६ डिसेंबर २०२३ला जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शेलापुर खुर्द, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका कुमारी सुजाता गणपत अहेर यांनी दिली तर आभार प्रदर्शन कुमारी योगिता गजानन ठाकरे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंगी असलेल्या गुणांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली व त्यांचे आदर्श आपण सुद्धा घ्यावे असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.