सामाजिक

भारतीय बौध्द महासभा मोताळा तालुका अध्यक्ष पदी पवनकुमार गायकवाड तर तालुका सचिव पदी श्रीकृष्ण सुरडकर यांची नियुक्ती.

राष्ट्रीय अध्यक्ष : आयु. राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या हस्ते नियुक्ती.

सक्षम न्युज (प्रतिनिधी) : मोताळा तालुक्यात धम्म कार्याला फार मोठी मरगळ आलेली आहे, सुजान , अभ्यासू , धम्म कार्याची आवड व तळमळ असलेले सदाचार संपन्न कार्यकर्त्यांनी धम्म कार्याकडे पाठ फिरवून घरात स्वस्थ बसणे पसंत केले आहे , अनेक धम्म उपासक उपसिका धम्म कार्यापासून अलिप्त राहत आहेत, त्यामुळे समाज स्वास्थ्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे, यातून समाजाला सावरण्यासाठी ,धम्म कार्याला आलेली मरगळ झटकून धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने समाजकार्यात रुची असणारे आणि धम्म कार्यात नेहमी अग्रेसर असणारे , धम्म कार्यात रात्रंदिवस झटणारे आयु. पवनकुमार रामकृष्ण गायकवाड आणि आयु. श्रीकृष्ण जगदेव सुरडकर यांची भारतीय बौद्ध महासभा मोताळा तालुका कार्यकारणीत नियुक्ती केली आहे, आणि यामुळे धम्म चळवळीला फार मोठी गती प्राप्त होणार आहे,

आयु.पवनकुमार गायकवाड हे त्यांच्या निर्भिड स्वभावाने आणि बुद्ध धम्म चळवळी साठी रोख ठोक भूमिका घेणारे म्हणून ओळखले जातात .       तर               आयु. श्रीकृष्ण सुरडकर हे धम्म कार्यात त्यांच्या प्रखर आणि स्पष्टवक्ते पणा स्वभावाचे म्हणून ओळखले जातात ,

हे दोघेही समाज कार्यात आणि धम्म कार्यात नेहमी अग्रेसर असतात,

यांनी दोघांनी ही अविरत केलेल्या समाज कार्याची आणि धम्म कार्याची दखल घेऊन भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. राजरत्न आंबेडकर साहेब यांनी दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी आयु.पवनकुमार रामकृष्ण गायकवाड यांची मोताळा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे .तर  आयु. श्रीकृष्ण जगदेव सुरडकर यांची तालुका सचिव/सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे .

या दोघांच्याही नियुक्तीने मोताळा तालुक्यात धम्म कार्याला एक मोठी दिशा मिळाली आहे आणि या डगमगलेल्या समाज कार्याला फार मोठी अश्वगती प्राप्त होणार आहे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष आयु.सुरेश डवरे साहेब यांनी केले आहे.

 

सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष आयु.राजरत्न आंबेडकर साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयु.हनुमंते साहेब, व राज्य कार्यकारणी, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आयु. सुरेश डवरे साहेब व जिल्हा कार्यकारणी , सदस्य आणि धम्म कार्यात अग्रेसर असणारे धम्म उपासक उपसीका व इतर सर्व उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button