सहाय्यक शिक्षक शेख मतीन शेख नजीर यांचे चिखलीत सत्कार
चिखली प्रतिनिधी : वाय डी एस ट्रेडर्स व इसहाख खान मित्र मंडळ तर्फे शेख मतीन शेख नजीर यांचे सत्कार करण्यात आले
जि.प. उर्दू उच्च प्राथमिक शाळा मुले देऊळघाट येथे कार्यरत शिक्षक शेख मतीन शेख नजीर या वर्षी इंग्रजी विषयात सेट (स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ) मध्ये क्वालिफाय झाले.तसेच त्यांना यावर्षी(इनोव्हेटिव्ह टीचर ऑफ द इयर) नेशनल एजुकेशन ब्रिलियंस अवार्ड २०२३ प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नवी दिल्ली येथे वैयक्तिक नामांकनांच्या श्रेणींपैकी एक ज्यामध्ये शिक्षक, संशोधक, प्राध्यापक, अध्यक्ष, संचालक, शैक्षणिक नेते, शास्त्रज्ञ इत्यादींचा समावेश आहे, वैयक्तिक नामांकनामध्ये शेख मतीन शेख नजीर यांची इनोव्हेटिव्ह टीचर ऑफ द इयर पुरस्कार २०२३ च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जे जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक मुले शाळा देऊळघाट, तालुका व जिल्हा बलढाणा येथे सहाय्यक शिक्षक म्हणून आपली अधिकृत कर्तव्ये पार पाडत आहेत.सहाय्यक शिक्षक शेख मतीन यांनी यावर्षी इंग्रजी विषयात राज्य पात्रता परीक्षा (सॅट) उत्तीर्ण केली आहे. इतर विषयांबरोबरच त्यांना इंग्रजी विषयावर प्रभुत्व आहे. ते अत्यंत तळमळीने , स्वतःला झोकून विद्यार्थ्यांना शिकवतात आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. एक हुशार, ज्ञानी, सक्रिय, विद्यार्थी-अनुकूल असल्याने, तो आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करतो.सेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल व राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल वाय डी एस ट्रेडर्स व इसाक खान मित्र मंडळ तर्फे सत्कार करण्यात आले. यावेळी शेख नजीर शेख बुढण, इसाक खान , आजम भाई , इल्याज खान,मोहम्मद शौकत सर सेवानिवृत मुख्याध्यापक, शब्बीर भाई , शैख़ सांडो ,अफजल भाई. शेख अल्ताफ,जुनेद खान ,तासलीम खान , शेख ,तमकीन संदिप भाव इरफान भाई, शोहिब खान ,स्टार टीव्ही 9 चे संपादक शेख फारुख,संघर्ष नायक चे शेख राजीक दैनिक विदर्भ दस्तक चे संपादक शेख इद्रिस शेख नजीर उपस्थित होते सर्व मित्रपरिवार व नातेवाईकांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत..