सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश.
सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचे निडर व सच्चे एकनिष्ठ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई निळकंठ वानखेडे यांच्या अध्यक्षतेत असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश.
मोताळा (प्रतिनिधी) : बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारी सेना म्हणजेच रिपब्लिकन सेना.
रिपब्लिकन सेना ही आपल्या कार्यातून आणि चळवळीतून व वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असते, आणि या सेनेचे सरसेनानी हे दुसरे तिसरे कोणी नसून , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु , मा.आनंदराज आंबेडकर साहेब हे स्वतः आहेत. आणि मा.आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या खंबीर नेतृत्वात ही रिपब्लिकन सेना काम करीत आहे,
इंदुमिल च्या आंदोलनात आणि लढ्यात सर्वात मोठा मोलाचा वाटा हा सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा होता हे संपूर्ण देशाने पाहिले आहे .
देशात , राज्यात कुठेही बहुजनांवर अन्याय अत्याचार झाला तर हा ढाण्या वाघ चवथाळून उठतो आणि अन्याय करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवतो. अशा खंबीर नेतृत्वात ही रिपब्लिकन सेना काम करीत असते.
सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा असाच ढाण्या वाघ, एक निष्ठ, निडर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आहे ते म्हणजे भाई निळकंठ वानखेडे.
रिपब्लिकन सेना चे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई निळकंठ वानखेडे यांच्या अध्यक्षतेत सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून कवाळे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी व आंबेडकरी चळवळीतील असंख्य सच्चे अनुयायी व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
दिनांक २६/०२/२०२४ रोजी मोताळा पंचायत समिती कार्यालय येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे जिल्हा अध्यक्ष भाई निळकंठ वानखेडे यांच्या अध्यक्षतेत रिपब्लिकन सेने तर्फे भव्य जाहीर प्रवेश चा कार्यक्रम घेण्यात आला.
त्यात प्रामुख्याने भीमराव खराटे, शेषराव गायकवाड, अशोक धुरंधर, मधुकर शिरसाठ, विनोद वानखेडे, राजेंद्र सावळे, अशोक मोरे, मधुकर अवचार, सुरेश गवई, चंद्रभान खराटे, डिगांबर पवार, प्रकाश प्रधान, उत्तम जाधव, मधुकर वकोडे, मिलिंद बोदडे व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश घेतला आहे,
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे व मोताळा तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते,
भाई निळकंठ वानखेडे, जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना, संदीप मोरे, अजय खराटे, रवी रायपुरे, विनोद सावळे, बळीराम नरवाडे, पुंडलिक उमाळे, सिध्दार्थ पवार, गौतम सरकटे, करण खराटे, पद्माकर जाधव, विलास जाधव, पप्पू मोरे, आकाश जाधव, गजानन वानखेडे, पवन गायकवाड, श्रीकृष्ण सुरडकर, सुनील निकाळजे, प्रमुख पदाधिकारी व इतर सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.