महाराष्ट्र

संग्रामपुर अंगणवाडी सेविका मदतणीस यांचा एकात्मीक बालविकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा व जेलभरो आंदोलन अंगणवाडी महिला कर्मचारी यांना तामगाव पोलीसा कडून अटक व सुटका

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] : अंगणवाडी सेविका मदतणीस यांच्या प्रलंबीत मांगण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतणीस संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने लक्ष वेधी आंदोलन करण्यात आले परंतु अंगणवाडी सेविका मदतणीस यांच्या प्रलंबीत मांगण्या कडे शासनाने लक्ष दिले नसल्याने समस्या जैसे थे असल्याने अंगणवाडी सेविका मदतणीस संघटना शाखा संग्रामपुरच्या वतीने संग्रामपुर बस स्थानक ते एकात्मीक बाल प्रकल्प विकास कार्यालया दरम्यान मोर्चा काढून शासनाचा निषेध करित जेलभरो आंदोलन करण्यात आले , मोर्चाचे रुपांतर छोटे खानी सभेत झाले यात उपस्थित अंगणवाडी सेविका मदतणीस महिला कर्मचाऱ्यांना आयटक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षा तुळसाबाई बोपले यांनी संबोधीत करतांना प्रलंबीत मांगण्याची पुर्तता शासन करत नसल्याने अंगणवाडी सेविका मदतणीस यांनी अंगणवाड्या बंद ठेवुन बंद दरम्यान शासनाला अहवाल सादर न करण्याचे आव्हान त्यांनी केले अंगणवाडी सेविका मदतणीस महिला यांच्या जेलभरो आंदोलन दरम्यान आंदोलन कर्त्या अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना तामगाव पोलीसांनी स्थानबद्ध केले होते प्रलंबीत मांगण्या साठी निघालेला मोर्चा व जेलभरो आंदोलन दरम्यान आयटक संघटनेचे राज्य  जिल्हा स्थरावरील पदाधिकारी व तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतणीस सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button