शेकडो बहुजनांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश.
आरपीआय गवई गट व इतर राजकीय तथा सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश.
:……..* सक्षम न्युज *……..:
* शेकडो बहुजनांचा ‘वंचित’मध्ये जाहीर पक्ष प्रवेश *
* आरपीआय गवई गट व इतर राजकीय तथा सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश*
बुलढाणा (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय नेते श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून बुलढाणा तालुक्यातील व शहरातील बहुजन बांधवांनी तसेच आर पी आय गवई गटाचे बुलढाणा शहराध्यक्ष अब्दुल हमीद अब्दुल कादर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर आरपीआय गवई गट व इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांसह 26 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव, जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, जिल्हा महासचिव प्रा.विष्णू उबाळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर, तालुकाध्यक्ष मनोज खरात, शहर महासचिव विजय राऊत आणि दिलीप राजभोज यांच्या उपस्थितीत व शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
इतर विविध प्रस्थापित पक्षांना सोडून सदर कार्यकर्त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी कडून पक्ष विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर पक्ष बांधणीचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बुलढाणा शहरातील अजिंठा विश्राम भवन या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला. परंपरागत पक्षांच्या उपेक्षित व काठावरचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी कडून होणारी विविध आंदोलने व सामाजिक उपक्रमांमुळे वंचित कडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी वंचित चे जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी व न्याय हक्कासाठी सदैव झटत राहील. आपला पक्ष शासन व प्रशासनाकडे न्याय हक्कासाठी भांडणारा असून नेहमीच वंचित बहुजनांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे हे वादळ असेच घोंगवत ठेवण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी काळात पक्षासाठी झोकुन देऊन काम करा व बहुजनांची सत्ता आणण्यास हातभार लावा असे आवाहन जाधव यांनी केले. महासचिव प्रशांत वाघोदे, प्रा.विष्णु उबाळे, मोहित दामोदर, मनोज खरात, मिलिंद वानखडे यांचे यावेळी समयोचित भाषणे झाली.
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये अब्दुल हमीद अब्दुल कादर, लतीफोद्दीन काझी, मो.शफी शेख हबीब, शे. अफसर शेख सुलेमान, शे.जावेद शे.हकीम, अ. मुनिद अ. कादर, सुभाष शिंदे, मोहम्मद सोहेल, शेख नासिर शेख मुनाफ, मेहबूब खान रशीद खान, मजीद खान इमान खान, अजर हुसेन तजमुल हुसेन, जावेद खान नूर खान, सलीम खान हबीब खान, अफरोज खान अहमद खान, प्रवीण जाधव, माधव सरकटे, स्वप्निल अवसरमोल, गणेश अवसरमोल, संजय खंडागळे, दत्ता अवसरमोल, दीपक निकाळजे, पुंजाराम अवसरमोल, भानुदास बावस्कर, फकीरा अवसरमोल, गजानन खंडागळे, किशोर अवसरमोल, समाधान अवसरमोल, गजानन अवसरमोल, अरुण अवसरमोल, रामेश्वर अवसरमोल, शालिग्राम सपकाळ, किरण गवई, प्रकाश गुर्जर, रघुनाथ इंगळे, भास्कर इंगळे, रंजीत पालकर, चांगदेव पोपळघट यांच्यासह इतर अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
पक्ष प्रवेश कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुलढाणा शहर महासचिव विजय राऊत, दिलीप राजभोज, सुशील वानखडे, शेख अनिस, सत्यपाल डोंगरे, राजू वानखडे इ.महत्वाची भूमिका पर पाडली.