वंचित बहुजन आघाडी चे तहसिलदार मोताळा यांना निवेदन सादर.
वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष समाधान भाऊ डोंगरे यांच्या नेतृत्वात मोताळा तहसिलदार यांना निवेदन सादर.
* सक्षम न्युज *
“मोताळा – (प्रतिनिधी) आज दिनांक २५/०१/२०२४ रोजी, वंचित बहुजन आघाडी, तालुका मोताळा, तर्फे तहसीलदार मोताळा, यांना महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या जातीनिहाय सर्वेक्षणातील ऑनलाईन ॲप्स मध्ये जातीच्या रकान्यात बौद्ध जातीचा समावेश करणे बाबत निवेदन सादर करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,
सध्या महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षण संदर्भात जातीनिहाय ऑनलाईन सर्वे सुरू आहे, आणि ते करत असताना ऑनलाईन सर्वे ॲप्स मध्ये जातीच्या रकान्यात बौद्ध या जातीचा उल्लेख नाही,
त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध लोकांमध्ये संभ्रम व अस्वस्थता निर्माण झालेली आहे ,
कारण ऑनलाईन सर्वे ॲप्स मध्ये जातीच्या रकान्यात महार जात नमूद केल्यास, महार जात ही हिंदू धर्मातील पोट जात आहे,
त्यामुळे जनगणनेत बौद्ध हे बौद्ध असूनही वगळण्यात येतील आणि जात बौद्ध A2 मध्ये उल्लेख केल्यास बौद्ध हे इतर मध्ये गणल्या जातील,
त्यामुळे इतर जातीची संख्या ही जास्त दर्शविली जाईल, मात्र बौद्ध लोकांना त्याचा काहीही उपयोग होणार नाही,
आणि एक प्रकारे घर के ना घाट के अशी बौद्धांची अवस्था होईल , आणि बौद्धांची संख्या ही आहे तेवढी न दर्शवता कमी दर्शवली जाईल ,
पर्यायाने सर्व स्तरावर बौद्ध लोकांची अपरिमित हानी होईल , त्याकरिता जनगणना फॉर्म मध्ये दुरुस्ती करून जातीच्या रकान्यात बौद्ध जातीचा समावेश करावा व त्यानंतर जातीय जनगणना , सर्वेक्षण करण्यात यावे जेणेकरून बौद्धांची वस्तुनिष्ठ लोकसंख्या दर्शवली जाईल.
असे निवेदन वंचित बहुजन आघाडी तालुका मोताळा, यांच्या वतीने तहसिलदार मोताळा, तहसील कार्यालय मोताळा , जिल्हा बुलढाणा. यांना देण्यात आले आहे .
निवेदन सादर करतेवेळी ,
मा.समाधानभाऊ डोंगरे (तालुका अध्यक्ष मोताळा,).
मा. प्रशांतभाऊ वाघोदे, (जिल्हा महासचिव बुलढाणा).
मा. डी .टी . इंगळे (जिल्हा वरिष्ठ कार्यकर्ते).
मा. विशाल मोरे (तालुका महासचिव मोताळा).
मा. राजू वाकोडे (जिल्हा युवा उपाध्यक्ष बुलढाणा ).
मा. सुनील तेलंग (तालुका उपाध्यक्ष मोताळा ).
मा. राजेंद्र बोराडे पाटील (मुख्य संघटक मोताळा).
मा. प्रमोद शिरतुरे , मा.धनराज तायडे , मा.अमोल गवई , मा.डॉ. संजयभाऊ गवई , मा.वासुदेव गरुडे, मा.जनार्दन झिने , मा.सचिन अहिरे , मा.राजूभाऊ सुरडकर , मा.वासुदेव गरुडे , मा.जगदेव इंगळे, मा.कल्पेश इंगळे, मा.राजू बोरसे, मा.राजेंद्र दाभाडे, मा.विलास प्रधान, मा.राष्ट्रपाल खंडारे , मा.रुपाजी खराटे व इतर सर्व उपस्थित होते .