वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनामुळे मलकापूर तहसील कार्यालयात लागले महापुरुषांचे फोटो.
जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे ह्यांच्या नेतृत्वातील लढ्याला यश.
* सक्षम न्युज. *
मलकापूर (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मलकापूर तहसील कार्यालयात ५ जानेवारी रोजी महापुरुषांचे फोटो लावण्याकरिता जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे ह्यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.
सदर आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित झाले होते. लवकरात लवकर महापुरुषांचे फोटो तहसील कार्यालयात आगामी काळात लावले नाही तर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा स्थानिक नेतृत्वाकडून देण्यात आला होता.
त्या अनुषंगाने २५ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मलकापूर तहसील कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावण्यात आले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, तहसीलदार राजेश सुरळकर साहेब, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष एस.एस.वले सर, तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे, जेष्ठ नेते बाळासाहेब दामोदर, संघटक भाऊराव उमाळे, शहर नेते अजयभाऊ सावळे, ता.सचिव गणेश सावळे, ता.उपाध्यक्ष विलास तायडे, यासीन कुरेशी, किशोर मोरे, बाळकृष्ण सोनवणे आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.