मोताळा येथे भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोताळा फाटा येथे अभिवादन सभा संपन्न.
मोताळा प्रतिनिधी : मोताळा येथे दि.६ डिसेंबर २०२३ ला भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोताळा फाटा येथे अभिवादन सभा घेण्यात आली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष आद.बौ.निवृत्ती वानखडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आद.प्रशांतजी इंगळे केंद्रीय शिक्षक, आद.प्रशांत भाऊ वाघोदे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी, आद.समाधान भाई डोंगरे तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, आद.गजेंद्र बोराडे, आद.विशाल मोरे तालुका महासचिव वंचित बहुजन आघाडी, आद.वंसतराव इंगळे केंद्रीय शिक्षक, आद.गजानन अहिरे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत महामानवांना पुष्प व धुप व दिप प्रज्वलन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करणयात आले. समता सैनिक दलाची मानवंदना सैनिक लाला गवई व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
.सदर कार्यक्रमाला तालुक्यातून बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौध्दाचार्य .आयु.निलेश वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु.अमोल थाटे तालुका कोषाध्यक्ष यांनी केले.