
बुलढाण्यात अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची जिल्हा कार्यकारिणी गठीत
देऊळघाट : दिनांक १ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोजी इकरा फंक्शन हॉल देऊळघाट इथे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय
उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष व सरचिटणीस माननीय श्री साजिद निसार अहमद होते. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ भारताचे 18 राज्यामध्ये सक्रिय आहे व महाराष्ट्राच्या अनेक जिल्यात या संघटनेची जिल्हा कार्यकारणी गठित करण्यात आली आहे व कार्य करीत आहे. बुलढाणा जिल्ह्याची कार्यकारणी गठीत करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून वाशिम जिल्ह्याचे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री हसीन देशमुख उपस्थित होते. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या कार्यकारणी मध्ये जि .प उर्दू उच्च प्राथमिक शाळा मुले देऊळघाट चे सहाय्यक शिक्षक श्री शेख मतीन शेख नजीर सरांना जिल्हा अध्यक्ष पदाचा नियुक्ती पत्र कार्यक्रमाचे अध्यक्षाचे हस्ते प्रदान करण्यात आला .तसेच सचिव म्हणून उमर फारुख खान फयाज खान सहाय्यक शिक्षक धाड पंचायत समिती बुलढाणा , उपाध्यक्षपदी यावर खान सत्तार खान पंचायत समिती संग्रामपूर , व मोहम्मद इजहारूलहक आगा मेहमूदूलहक , सहसचिव पदी अब्दुल वाजिद मोहम्मद शफी , कार्याध्यक्ष पदी शेख इकबाल शेख जमाल पंचायत समिती खामगाव , कोषाध्यक्षपदी नासिर खान लतीफ खान पंचायत समिती बुलढाणा, जिल्हा नेते म्हणून अब्दुल रहीम अब्दुल रज्जाक शेख पंचायत समिती संग्रामपूर , सल्लागारपदी आयाज मलिक खान फिरोज खान पंचायत समिती नांदुरा व बिलाल अहमद गुलाम रब्बानी पंचायत समिती मोताळा , प्रसिद्धी प्रमुख पदी अकमाम हुसेन इकराम हुसेन पंचायत समिती शेगाव, संघटक म्हणून सलमान जब्बार सुरतने पंचायत समिती
जळगाव जामोद , मोहम्मद सालीक मोहम्मद आरिफ पंचायत समिती नांदुरा, व हारीस गफ्फार सुरतने पंचायत समिती संग्रामपूर , जिल्हा सदस्य म्हणून जुबेरोद्दीन मोईनोद्दीन पंचायत समिती बुलढाणा, फिरोज खान मनसब खान पंचायत समिती नांदुरा, , शेख नदीम शारिक अब्दुल करीम पंचायत समिती चिखली, तर जिल्हा सदस्य महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती शबीना अमीर हमझा पटेल पंचायत समिती खामगाव यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष व सरचिटणीस माननीय श्री साजिद निसार अहमद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराणचे वाचन करून करण्यात आले. शेख नईम अब्दुल्ला सरांनी हम्द व जमील शाह मंजूर शाह सरांनी नाते पाक चे गायन केले.या प्रसंगी मुख्याध्यापक अब्दुल्ला खान बिस्मिल्ला खान , मुख्याध्यापक इस्माईल खान फयाज खान, मुख्याध्यापक शेख अबरार शेख मदार , शकील खान प्रशासन अधिकारी चिखली , इकरा एज्युकेशन ट्रस्ट चे संस्थापक शेख अहमद शेख सत्तार , रियाज अहमद सर, नईम मलिक सर, इल्यास सर , फिरोज खान सर, शेख परवेज सर , माजिद रजा सर व इतर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हसीन देशमुख सरांनी कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. सय्यद अंजुम सरांनी व रिजवान अहमद देशमुख सरांनी मनोगत व्यक्त केले , अध्यक्ष भाषण साजिद निसारांनी केले . आभार प्रदर्शन शेख मतीन सरांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकिब रजा सरांनी केले.
सर्व नवनियुक्त कार्यकारणीत सामील सदस्यांना उपस्थित शिक्षकांनी व मित्रांनी शुभेच्छा दिल्या