विशेष बातमी

बुलडाण्यात रविवारी ” प्रबुद्ध-भारत ” वाचक मेळावा.

सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा अध्यक्ष सतीश पवार यांचे आवाहन.

           ……….. * सक्षम न्युज *………

बुलडाणा (प्रतिनिधी) : कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी तिला वर्तमानपत्राची गरज असते, ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते,  असे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.          बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या ” प्रबुद्ध भारत ” या पाक्षिकाचा वाचक मेळावा २८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजता, बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी, मलकापूर रोड, बुलडाणा. येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

 

बहुजनांच्या आई प्रा.अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याला वाचन प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,  असे आवाहन आयोजक तथा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीशभाऊ पवार यांनी केले आहे.

उद्घाटना नंतर ,  प्रा.अंजलीताई आंबेडकर प्रमुख    मार्गदर्शन करणार आहेत.

सदर कार्यक्रमाला भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने,  वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक तथा प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर,  प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा,  महासचिव राजेंद्र पातोडे,  भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव तायडे,  महिला प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंढे,  प्रबुद्ध भारतचे उपसंपादक जीतरत्न पटाईत,  जिल्हाध्यक्ष निलेश जाधव,  जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, जिल्हा संघटक बालाभाऊ राऊत,  विधी सल्लागार अमर इंगळे,  जिल्हा उपाध्यक्ष भीमराव सिरसाठ, तालुकाध्यक्ष समाधान डोंगरे,  संजय धुरंदर,  उद्धव वाकोडे, मधुकर शिंदे, दिलीप राठोड, शेख मोबीन, राजूभाऊ वाकोडे, अर्जुन खरात, विशाल गवई,  डॉ. राहुल दाभाडे, संतोष कदम, राहुल वानखेडे, गौतम गवई, सतीश गुरचवळे, उत्तम पैठने, अनिल पारवे, सूरज सोनवणे, ॲड. एस. एस. वानखेडे, ॲड. कैलास कदम, ॲड. सुरडकर, विजय इंगळे, विशाल साळवे, दीपक सोनपसारे, सूर्यनंदन जाधव, राहुल बनसोडे यांची उपस्थिती राहणार आहेत.

बहुजनांच्या आई प्रा.अंजलीताई आंबेडकर यांच्यासह मान्यवरांचे विजयनगर , बुलडाणा येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी   मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष सतिशभाऊ पवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button