जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शेलापूर खुर्द येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
विविध स्पर्धेत यश मिळवले बाबत यशस्वी स्पर्धक विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप.
* सक्षम न्युज *
आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, शेलापुर खुर्द, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा, येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व शााळा दर्पण , ग्रामपंचायत मार्फत मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, मा.सौ सरलाताई सरोदे यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच मा. सौ सपना ताई नारखेडे व मोताळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, श्री. धीरबस्सी साहेब लाभले.
सदर कार्यक्रमासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, श्री.सरदार साहेब, तलाठी इंगोले मॅडम, आशा वर्कर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य इतर मान्यवर मंडळी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व गावकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेच्या मुख्याध्यापिका, कुमारी सुजाता गणपत अहेर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका, कुमारी योगिता गजानन ठाकरे मॅडम यांनी केले .
क्रीडा स्पर्धा, गीत गायन स्पर्धा व चित्रकला स्पर्धा यातील यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .
मोताळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, मा.श्री. धीरबस्सी साहेब यांनी मार्गदर्शनपर भाषण केले, मुख्याध्यापिका व शिक्षिका यांचा गौरव केला.
सदर कार्यक्रमाला समस्त शेलापुर खुर्द गावाने मदत केली. आणि प्रजासत्ताक दिन अतिशय उल्हासाने साजरा करण्यात आला .
सदर कार्यक्रमाला जनतेकडून गावच्या समस्त नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.