
जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शेलापुर खुर्द येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
सक्षम न्युज प्रतिनिधी – आज दिनांक ०३/०१/२०२४ रोजी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शेलापुर खुर्द, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
सदर कार्यक्रमाची सुरुवात ही सावित्रीमाई यांच्या प्रतिमे समोर दीप प्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली,
शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी सुजाता अहेर, यांनी विद्यार्थ्यांना व नागरिकांना सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाची व केलेल्या अनमोल कार्याची माहिती दिली व अभिवादन व्यक्त केले,
तसेच सा.शिक्षिका कुमारी योगिता ठाकरे यांनी सुद्धा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन व्यक्त करत अखिल स्त्रियांच्या शिक्षणासाठी, व न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रथम स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो अशा उत्साही घोषणा देऊन आभार प्रदर्शन केले,
सदर कार्यक्रमास नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देत टाळ्यांचा गजर केला.
सदर कार्यक्रमास विद्यार्थी , पालकवर्ग, आणि सर्व ग्रामस्थ , नागरिक उपस्थित होते .