
ग्रामपंचायत शेलापुर खुर्द येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
सक्षम न्युज (प्रतिनिधी) – ग्राम पंचायत कार्यालय शेलापूर खुर्द, ता. मोताळा, जि. बुलढाणा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,
सदर कार्यक्रमात कुमारी सुजाता आहेर, मुख्याध्यापिका जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शेलापूर खुर्द, यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून पूजन केले तर सहाय्यक शिक्षिका कुमारी योगिता ठाकरे, यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,
ग्रामपंचायत कार्यालय शेलापूर खुर्द चे सचिव, श्री आर. आर. तायडे साहेब , यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्ष व सावित्रीमाईनी केलेले अनमोल कार्य याबद्दल माहिती दिली व अभिवादन व्यक्त केले,
तसेच श्री.राजेंद्र गोपाळ गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले तसेच श्री.अजय लक्ष्मण पाटील यांनी आभार व्यक्त केले,
सदर कार्यक्रमास सर्व नागरिक उपस्थित होते त्यात प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.अजय लक्ष्मण पाटील, श्री.अतुल प्रकाश पाटील, श्री.पंकज लक्ष्मण सुपे, श्री.विजय सोपान पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.