आगामी विधानसभा निवडणुक संदर्भात वंचित ची महत्वपुर्ण बैठक संपन्न.
तालुका अध्यक्ष समाधानभाई डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली मोताळा येथे बैठक संपन्न.
आगामी विधानसभा निवडणुक संदर्भात वंचित ची महत्वपुर्ण बैठक संपन्न.
आगामी विधानसभा निवडणुक संदर्भात वंचित बहुजन आघाडी ची महत्वपुर्ण बैठक गुरूवार ला वंचित चे जिल्हा नेते प्रशांत भाऊ वाघोदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व तालुका अध्यक्ष समाधानभाई डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह पंचायत समिती मोताळा येथे संपन्न झाली.
बैठकित अतिक्रमण गायरान संदर्भात प्रशांत भाऊ वाघोदे, भिमराव सिरसाट, समाधान डोंगरे ,डी टी ईंगळे,शेषराव उमाळे, युवराज भिडे,एम सावळे,डब्ल्यु डी वानखेडे जि एन अहिरे,अमोल गवई,संदीप गवई,यांनी मार्गदर्शन केले .
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला स्विकारून आगामी विधानसभा निवडणुका मोठ्या ताकदिने लढू असा चंगच या वेळेस वंचित पदाधिकारीऱ्यांनि बांधला.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात शेकडो युवकांची,महिलांची, विद्यार्थी यांची, पदभरती करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास भाऊ प्रधान यांनी तर सुत्रसंचालन सागर बोदडे यांनी केले.
आभार गौतम थाटे यांनी केले.
या बैठकीसाठी, विशाल मोरे, प्रशांत बोदडे, सचिन मेढे,रविराज खराटे,गरूडे,गजानन बोराडे,प्रमोद सुरळकर,राष्ट्रपाल खंडारे,ई.मेहनत घेतली.